शरद पवार उद्या भाजपचे समर्थन करायला लागले तर... : राधाकृष्ण विखे पाटील

in #yavatmal2 years ago

शिर्डी (जि.अहमदनगर) : भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावरील ईडीने केलेल्या कारवाईवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली आहे. महाविकास आघाडी नव्हे तर महाभ्रष्टाचारी सरकार असल्याचा आरोप त्यांनी केला. पुराव्यांशिवाय ईडीकडून कारवाई होत नाही. नवाब मलिकांच्या प्रकरणावरुन हे सिद्ध झाल्याचे विखे पाटील म्हणाले.