तानाजी सावंताच्या मंत्रिपदाने मंगळवेढ्यात जल्लोष

in #wortheum2 years ago

मंगळवेढा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या कोट्यातून आ. तानाजी सावंत यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मंगळवेढा तालुक्यात जल्लोष करण्यात आला.ना. तानाजी सावंत हे उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा येथील आमदार असले तरी त्यांचा लवंगी, ता. मंगळवेढा येथील भैरवनाथ शुगर युनिट 3 या साखर कारखानदारीच्या निमित्ताने मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागाशी लवंगी परीसरात त्यांचा संबंध आला. तालुक्यासह शेजारच्या तालुक्याच्या ऊस गाळपाची सोय झाली व तालुक्यातील काही बेरोजगारांना नोकरीच्या निमित्ताने संधी मिळाल्या त्यामुळे साहजिकच त्यांचे या भागांमध्ये समर्थक निर्माण झाले आहेत. 2014 ते 19 या कालावधीत ते कॅबिनेट मंत्री म्हणून राहिले होते. मात्र, राज्यात सत्ता बदलाच्या नाट्यमय घडामोडीनंतर त्यांना पुन्हा संधी मिळाली नसल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये खदखद होती. परंतु, नुकत्याच झालेल्या सत्ता बदलाच्या नाट्यमय घडामोडीनंतर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाल्यानंतर त्यांच्यासोबत राहिलेले ना. तानाजी सावंत यांचा समावेश निश्चित मानला जात होता. मात्र, संधी कधी मिळणार याची उत्सुकता या भागात लागली होती.