उगाच जिंकली 25 कोटींची लॉटरी.

in #yavatmal2 years ago

उगाच जिंकली 25 कोटींची लॉटरी'; कोट्यधीश होऊनही का पश्चाताप करतोय रिक्षाचालक?Untitled-design-2022-09-24T162237.704.jpgदैनंदिन आयुष्यात अनंत अडचणी असतात. त्यातल्या बहुतांश समस्या पैशांशी निगडित असतात. अशा परिस्थितीत अचानक खूप पैसे मिळाले तर प्रत्येक अडचणीतून सुटका होऊ शकते आणि जगणं सुसह्य होईल, असं वाटायला लागतं.
नवी दिल्ली, 24 सप्टेंबर : दैनंदिन आयुष्यात अनंत अडचणी असतात. त्यातल्या बहुतांश समस्या पैशांशी निगडित असतात. अशा परिस्थितीत अचानक खूप पैसे मिळाले तर प्रत्येक अडचणीतून सुटका होऊ शकते आणि जगणं सुसह्य होईल, असं वाटायला लागतं; पण पैसा आला म्हणजे जीवन सुखी होईलच असं काही सांगता येत नाही. उलट मनस्ताप वाढून नातेसंबंधात कटुता येण्याची शक्यताही असते. याच बाबीची प्रचिती 25 कोटी रुपयांची लॉटरी (Lottery) जिंकलेल्या केरळच्या ऑटोरिक्षा ड्रायव्हरला (Auto Rickshaw Driver) येतेय. मोठ्या रकमेची लॉटरी जिंकल्यानंतर अवघ्या पाचच दिवसांत अनूप असं म्हणू लागला आहे, की 'एवढ्या मोठ्या लॉटरी लागली नसती तरी बरं झालं असतं.' ‘टीव्ही नाइन हिंदी’ने या संदर्भातलं वृत्त दिलंय.

पत्नी, मुलं आणि आईसोबत रिक्षाड्रायव्हर अनूप केरळमध्ये श्रीवराहम इथं राहतात. मुलांची बचत पेटी फोडून अनुप यांनी ओणम बंपर लॉटरीचं तिकीट एका स्थानिक एजंटकडून खरेदी केलं होतं. 25 कोटी रुपयांची लॉटरी लागल्यानं ते व त्यांचे कुटुंबीय आनंदित झाले; पण लॉटरीची एवढी मोठी रक्कम मिळणार असं कळताच त्यांच्याकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या. आता त्यांना टाळण्यासाठी अनूप यांना सतत तोंड लपवत फिरावं लागत आहे.लॉटरीबद्दल बोलताना अनुप म्हणाले, की ‘लॉटरी लागल्यानंतर माझी मन:शांती पूर्णपणे हरवून बसली आहे. मला घरात थांबणंही मुश्कील झालंय. माझ्याकडून अपेक्षा करणाऱ्यांची संख्या खूप झालीय. मी पहिलीच लॉटरी जिंकलीय; पण आता याचा पश्चातापच सहन करावा लागतोय. सतत एकाच ठिकाणी राहता येत नाहीये. लॉटरी मिळाल्याचं कळल्यावर जी मन:शांती आणि आनंद मिळाला होता, तो आता मी हरवून बसलो आहे.’लॉटरी लागल्यानंतर अनूप सध्या द्विधा मनस्थितीत आहेत. लॉटरी जिंकल्यापासून शेजारी, परिसरातल्या व्यक्ती सतत आपल्या अवतीभोवती असतात. काही ना काही मागण्या करतात किंवा मदत मागतात. अपेक्षा असणाऱ्यांना पैसे दिले नाहीत, तर आप्तस्वकीय व्यक्ती शत्रू होण्याची भीती त्यांना वाटत आहे. मिळणाऱ्या पैशांचं काय करायचं, यावर अद्याप काही ठरवलेलं नसल्याचं ते म्हणतात. सध्या तरी दोन वर्षं सगळे पैसे बँकेत ठेवणार असल्याचं ते सांगतात. इतकी मोठी रक्कम जिंकण्याऐवजी कमी पैसे मिळाले असते तरी चांगलं झालं असतं, असं वाटत असल्याचं अनूप म्हणत आहेत. या प्रकारामुळे मनःशांती हरपल्याची खंत अनूप यांनी व्यक्त केली
लॉटरी 25 कोटी रुपयांची लागली असली तरी टॅक्स (Tax) व उर्वरित रक्कम कपात (Deduction) होऊन सुमारे 15 कोटी रुपये अनुप यांना मिळणार आहेत. रक्कम मिळण्याआधीच त्यांच्याकडून लोकांच्या अपेक्षा इतक्या वाढल्या आहेत, की त्यांचं जगणंच मुश्किल झालंय. आतापर्यंत लॉटरीची रक्कम हातात मिळालेली नाही, हे सांगण्यासाठी सध्या सोशल मीडियाचा आधार घ्यावा लागत असल्याचं अनूप यांनी सांगितलं.