रामराजे की खडसे? विधान परिषदेसाठी दोघेही शरद पवारांच्या भेटीला

in #yavatmal2 years ago

उमेदवारीच्या इच्छेने धाव घेत आहेत. त्यातून आता कोणाचा पत्ता कट होणार आणि कोणाची विधान परिषदेवर वर्णी लागणार याकडे राज्याचं लक्ष लागून आहे. दरम्यान, राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांनी आज शरद पवारांची भेट विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून या दोघांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. रामराजे निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) सध्या विधान परिषदेचे सभापती आहेत. तर एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे नाव राज्यपाल नियुक्त बारा जागांसाठी पाठवले आहे. पण अजूनही राज्यपालांनी त्यांना मान्यता दिली नसल्याने आता विधान परिषदेवर त्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.दरम्यान, याच संदर्भात आज सकाळी रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या एकनाथ खडसेंना गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय पुनर्वसनाची अपेक्षा आहे. विधान परिषदेसाठी जर राष्ट्रवादीकडून त्यांना उमेदवारी मिळाली, तर ती त्यांच्यासाठी मोठी संधी ठरणार आहे.esakal_new__68_ (1).jpg