5 कोटींसाठी चंद्रशेखर गुरुजींचा खून; तपासातून धक्कादायक माहिती समोर

in #yavatmal2 years ago

कर्नाटक : सरल वास्तुतज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजी (Chandrashekhar Guruji) यांच्या हत्या (Murder) प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. दोन्ही आरोपींना बेळगाव जिल्ह्यातील (Belgaum District) रामदुर्ग येथून अटक करण्यात आलीय. महांतेश आणि मंजुनाथ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत.

सरल वास्तुतज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजी यांच्या खुनामागं 5 कोटींची मालमत्ता विकल्याचा विषय कारणीभूत असल्याचं पोलिसांच्या (Police) तपासात निष्पन्न झालंय. अनेक दिवसांपासून बेनामी मालमत्ता विकून पाच कोटी देण्यासाठी दबाव आणणाऱ्या महांतेश शिरूर यानं विविध वाहिन्यांवरील जाहिरातींमध्ये झळकणारे वास्तूशास्त्रज्ञ चंद्रशेखर अंगडी उर्फ चंद्रशेखर गुरुजींचा खून केल्याचं उघड झालंय.रागाच्या भरात केला खून
माहितीनुसार, चंद्रशेखर यांच्यासाठी सर्वस्व अर्पण केल्यावर मालमत्तेचे पैसे का द्यायचे, अशी विचारणा मारेकऱ्यानं केली आणि रागाच्या भरात मंजुनाथ मरेवाड याच्या सहकार्यानं त्यांचा खून केला. चंद्रशेखर यांचा बहुतांश व्यवसाय मारेकरी महांतेश शिरूर पाहत होता. चंद्रशेखर यांनी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता त्याच्या नावावर केली होती. चंद्रशेखर अंगडी बागलकोट जिल्ह्यातले होते. त्यांन सरल वास्तू या संस्थेची स्थापना केली होती. त्यांचं सरल जीवन नावाचं एक चॅनल होतं. कन्नड आणि मराठी टीव्ही चॅनलवर (Marathi TV Channel) त्यांचा कार्यक्रम रोज येतो. अंगडी यांचा जन्म बागलकोट जिल्ह्यात विरुपक्षप्पा आणि नीलमा अंगडी यांच्या पोटी झाला. त्यांना लहानपणापासूनच सैन्यात जायची इच्छा होती. पण, शारीरिक मानदंडात न बसल्यानं त्यांची निवड होऊ शकली नाही. त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आहे, अशी माहिती त्यांच्या वेबसाईटवर देण्यात आलीय.मारेकरी महांतेश-वनजाक्षी यांचे होते प्रेमसंबंध
मुंबईतील सरल वास्तूचे प्रमुख म्हणून काम करून शिरूर यानं चंद्रशेखर यांचा विश्वास संपादन केला होता. पण, एक मालमत्ता पाच कोटींना विकल्यावरून गदारोळ झाला. यामुळं महांतेशला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आणि याच मुद्द्यावरून झालेल्या वादातून हा खून झाला. मारेकरी महांतेश आणि वनजाक्षी यांचे प्रेमसंबंध होते. त्यातून त्यांचं लग्न झालं. चंद्रशेखर यांच्याबरोबर काम करणारा महांतेश याच्या आधी वनजाक्षी ही नोकरीला लागली. नंतर महांतेशही तिथंच कामाला लागला. त्यातूनच दोघांमध्ये प्रेम सुरू झालं. घरच्यांच्या नकळत चंद्रशेखर यांनी त्या दोघांचं लग्न लावून दिलं होतं.मारेकऱ्यांकडून खुनाची कबुली
हुबळीतील (Hubli) जे. पी. नगरात चंद्रशेखर यांनी एक अपार्टमेंट बांधलं आणि या जोडप्यानं कर्ज घेऊन त्यात 306 क्रमांकाचा फ्लॅट घेतला. त्यानंतर चंद्रशेखर यांच्याबरोबरचं त्यांचे संबंध चार वर्षांपासून ताणले होते. सध्या रिअल इस्टेटचा व्यवसाय करणारा महांतेश हुबळीतील फ्लॅटमध्ये दोन मुलींसह राहत आहे. पोलिसांनी मारेकऱ्यांची कवायत घेतली असून, पोलिसांकडून आरोपींची चौकशी करण्यात आली. मारेकऱ्यांनी गुरुजींचा खून केल्याची कबुली दिलीय.