भाजपाने शब्द दिलाय; एकनाथ शिंदेंचा व्हिडिओ व्हायरल

in #yavatmal2 years ago

मुंबई : बंडखोर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा एक व्हिडीओ (Video) समोर आला असून ते गुवाहटी येथील हॉटेलमध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व आमदारांना संबोधित करताना दिसत आहेत. यावेळी शिंदेंनी थेट भाजपचं (BJP) नाव न घेता आपल्याला एका राष्ट्रीय पक्षाचा (National Party) पाठिंबा असल्याचं सांगताना दिसून येत आहे. यात ते आपल्याला कुठेही कुठेही काही लागलं तरी कमी पडणार नाही, असा शब्द राष्ट्रीय पक्षाने दिल्याचेही सांगताना दिसत आहे. आता फक्त एकजुटीने राहयचं आहे. या राष्ट्रीय पक्षाने पाकिस्तानलाही पाकिस्तानला धडा शिकवलाय असेही शिंदे या व्हिडिओमध्ये सांगत आहे. दरम्यान, काही वेळापूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिंदेंच्या बंडात भाजपचा हात अजून तरी दिसत नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांनंतर शिंदेचा हा व्हिडिओ समोर आला व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये शिंदे हॉटेलमधील आमदारांना संबोधित करताना दिसत आहेत. यात ते भाजप आपल्या निर्णयाला काही कमी पडू देणार नाही, त्यांनी पाकिस्तानला धडा शिकवलाय असे सांगताना दिसत आहे. एवढेच नव्हे तर, शिवसेनेच्या सर्व आमदारांनी एकमुखाने आपल्याबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिवसेनेचे गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केल्याचे तसेच शिंदे जो काही निर्णय घेतील तो मान्य असेल याला सर्व उपस्थित आमदारांनी हात वर करून अनुमोदन दिले.

आपण कोणासोबत जायचे याबाबत त्यांनी थेट भाजपचे नाव जरी घेतलेले नसले तरी, देशातील एक राष्ट्रीय पक्ष असल्याचे तसेच हा पक्ष काहीच कमी पडू देणार नसल्याचे शिंदे आमदारांना सांगतांना दिसत आहेत. त्यावर तानाजी सावंत यांनी साहेब, तुम्ही जो निर्णय घ्याल त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू असे म्हणाताना दिसून येत आहेत.