महाराष्ट्राचा आगामी मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार';

in #yavatmal2 years ago

'महाराष्ट्राचा आगामी मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार'; मुंडेंच्या वक्तव्यावर काय म्हणाले पटोले?
राज्यात पाच वर्षांपेक्षा जास्त काळ पदावर असलेल्या 51 जणांनी राजीनामा दिलाय; पण आता आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळं या काळात नवीन अध्यक्ष नेमायचा का की, निवडणुकीपर्यंत यांना कायम ठेवायचं? याबाबत हायकमांडशी चर्चा करणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सांगितलं.नाना पटोले म्हणाले, केंद्र सरकार (Central Government) अपयशी ठरलं असून देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढलीय. या भाजप सरकारनं शेतकऱ्यांना बरबाद केलंय. भाजपचं केंद्र सरकार सर्व आघाडींवर अपयशी ठरलंय, त्यामुळंच भाजप गांधी कुटुंबीयांना लक्ष्य करत आहे. तसेच ईडीनं गांधी कुटुंबीयांना हात लावल्यास जेलभरो आंदोलन करू, असा इशारा पटोलेंनी दिलाय.भाजप 2014 आणि 2019 च्या निवडणुकीतपासून गांधी कुटुंबाला (Gandhi Family) लक्ष्य करत आहे. आपलं अपयश लपवण्यासाठी भाजपकडून गांधी कुटुंबाला लक्ष्य केलं जात आहे. ज्या दिवशी तपास यंत्रणा गांधी कुटुंबाला ताब्यात देईल, त्या दिवशी संपूर्ण देश जेलभरो आंदोलन करेल. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले होते, की महाराष्ट्राचा आगामी मुख्यमंत्री हा राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) असेल. यावर नाना पटोले म्हणाले की, प्रत्येकाला आस ठेवली पाहिजे, लोकशाहीत पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. काहींना दिवसाही स्वप्न पडतात, यावर काही बोलणार नाही असंही पटोले कोरोना आला तर निवडणूक आयोग त्याबाबत निर्णय घेऊ शकतो. निवडणुकीचा कालावधी ठरलेला नाहीय, एखादी नैसर्गिक आपत्ती आली असेल तर निवडणुका मागे-पुढे करण्याचा पूर्ण अधिकार आयोगाला आहे. तसेच ओबीसींचा इम्पेरीकल डाटा गोळा करण्याला वेग आला आहे, काँग्रेस याचा सातत्यानं पाठपुरावा करत आहे. जातिनिहाय जणगणनेसाठी 500 कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे, वेळ आली तर विकास कामे बाजूला ठेवा आणि जातिनिहाय जनगणना करावी, अशी भूमिकाही पटोलेंनी मांडलीयnana_potaol.jpg