सलमान खान धमकी प्रकरणाची महाराष्ट्र पोलिस गॅंगस्टर बिष्णोईची करणार चौकशी

in #yavatmal2 years ago

पुणे - अभिनेता सलमान खान व त्याचे वडील सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र पाठविणाऱ्या गॅंगस्टर लॉरेन्स बिष्णोई याची चौकशी आता महाराष्ट्र पोलिस करणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचे पथक दिल्लीला गेले आहे, अशी माहिती राज्याचे अतिरीक्त पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) कुलवंतकुमार सरंगल यांनी सोमवारी दिली. दरम्यान, सलमान खान धमकी प्रकरणाची पुर्ण माहिती सिद्धेश कांबळे ऊर्फ महाकाल यास होती, असेही त्यांनी सांगितले.पंजाबी गायक सिद्धु मुसेवाला खुन प्रकरणाची जबाबदारी घेणाऱ्या गॅंगस्टर लॉरेन्स बिष्णोई यानेच अभिनेता सलमान खान व सलीम खान यांना धमकीचे पत्र पाठविल्याची घटना यापुर्वी घडली होती. याप्रकरणी मुंबई पोलिसांकडे गुन्हा ही दाखल आहे. त्यादृष्टीने मुंबईच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. दरम्यान, मुसेवाला खुन प्रकरणामध्ये पंजाब पोलिसांनी जाहिर केलेल्या आठ शार्प शुटरपैकी संतोष जाधव व सिद्धेश कांबळे ऊर्फ महाकाल यांच्यासह नवनाथ सुर्यवंशी या तिघांना ग्रामीण पोलिसांनी काही दिवसातच बेड्या ठोकल्या. प्रारंभी पोलिसांनी महाकालला अटक केली. त्याच्या अटकेनंतर पंजाब पोलिस, मुंबईच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी महाकालची चौकशी केली होती.दरम्यान, संतोष जाधव व नवनाथ सुर्यवंशी या दोघांना अटक केल्यानंतर अतिरीक्त पोलिस महासंचालक कुलवंतकुमार सरंगल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सरंगल म्हणाले, ""महाकालला अटक केल्यानंतर त्याच्याकडे पोलिसांनी सलमान खान धमकी प्रकरणाची चौकशी केली. तेव्हा, त्याला धमकीच्या घटनेची पुर्ण माहिती, असे समजले. त्यावरुन पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक खोलवर तपास करण्याचे ठरविले आहे. मुंबई पोलिसांचे एक पथक लॉरेन्स बिष्णोईची चौकशी करणार आहे. पुणे ग्रामीण पोलिसांचे पथकही दिल्लीत तपास करत आहे. तसेच जाधव, महाकाल यांच्याशी चौकशीतुन या प्रकरणाबाबत आणखी काही धागेदोरे मिळण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.''महाकालच्या चौकशीमध्ये त्याने मुसेवाला प्रकरणात पंजाब, हरियाणामध्ये रेकी केल्याचे सांगितले आहे. तो संतोष जाधव बरोबर राजस्थान, दिल्ली येथेही काम केले आहे. महाकालने दिलेली माहिती संतोष जाधवच्या चौकशीत पडताळण्यात येईल.''

  • कुलवंतकुमार सरंगल, अतिरीक्त पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था).

बिष्णोई टोळीचे जाळे देशभर, समाजमाध्यमाद्वारे भेट

लॉरेन्स बिष्णोई टोळीचे सक्रीय सदस्य देशभरात आहेत. त्यामध्ये सातशेहून अधिक व्यक्तींचा सहभाग आहे. ते एकमेकांना प्रत्यक्षात भेटत नाहीत, मात्र इन्स्टाग्राम, फेसबुक अशा समाजमाध्यमांद्वारे ते एकमेकांच्या संपर्कात येतात व पुढील कट रचतात. महाकाल हा इन्स्टाग्राममार्फत बिष्णोई व गोल्डी बरारशी जोडला गेला होता.1police_41_1.jpg