नुपूर शर्माला VHP चा पाठिंबा, वक्तव्य योग्य की अयोग्य न्यायालय ठरवेल

in #yavatmal2 years ago

नवी दिल्ली : विश्व हिंदू परिषदने (VHP) भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. शर्मा यांचे विधान योग्य की अयोग्य हे न्यायालय ठरवेल असे विधान विहिंपने केले आहे. शर्मा यांचे विधान योग्य की अयोग्य हे न्यायालयल ठरवेल असे विधान विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी व्यक्त केले असून, या सर्व घटनेवर न्यायालयाच्या निर्णयाची वाट न पाहता देशभरात हिंसक आंदोलन करण्यात येत आहे हे अत्यंत चुकीचे आहे.लोक कायदा हातात घेत आहेत'न्यायालयाच्या निर्णयाची वाट न पाहता देशभरात हिंसक निदर्शने होत आहेत, कायदा त्याला परवानगी देतो का? उघडपणे बोलले जात आहे की, जर कोणी पैगंबरांबद्दल चुकीचं बोलत असेल तर, त्या व्यक्तीची जीभ कापली जाईल असे विधान लोकांकडून केले जात असून, लोक कायदा हातात घेत आहेत ही बाब देशासाठी चिंतेची असल्याचेही अलोक कुमार यांनी म्हटले आहे. प्रेषित महम्मद पैगंबर यांच्याबद्दल अवमानजनक वक्तव्य केल्यानंतर देशभारातून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. एवढेच नव्हे तर, शर्मा यांच्या वक्तव्याचा आखातील देशांनीदेखील नाराजी व्यक्त केले आहे. वाढत्या विरोधानंतर भाजपकडून भाजपने हकालपट्टी केली आहेनुपूर शर्मांना मुंबईत चौकशीला हजर राहण्याचे आदेशप्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma News) यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत असून, या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी नुपूर शर्मा यांना समन्स बजावले आहे. तसेच 22 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. नुपूर शर्माविरुद्ध मुंबईतील पायधुनी, ठाणे शहरातील मुंब्रा, पुणे येथे गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. (Mumbra Police Summons To Nupur Sharma)दिल्ली पोलिसांकडून सुरक्षाप्रेषित मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरून भारतीय जनता पक्षातून निलंबित करण्यात आलेल्या प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिल्ली पोलिसांनी सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. वादग्रस्त विधानानंतर आपल्याला व कुटुबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात येत असल्याची तक्रार शर्मा यांनी केली होती. त्यांच्या या तक्रारीची दखल घेत दिल्ली पोलिसांनी शर्मा व त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.nupur_vhp.jpg