Hrithik Roshan : सुपर ३० जपानमध्ये हिट; तीन वर्षांनंतरही जादू कायम

in #digras2 years ago

Hrithik Roshan Movie News हृतिक रोशनचा (Hrithik Roshan) ‘सुपर ३०’ चित्रपटाला जपानच्या प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. भारतात आणि इतर आंतरराष्ट्रीय बाजारात प्रदर्शित झाल्यानंतर तीन वर्षांनी सुपर ३० जपानमध्ये २३ सप्टेंबर रोजी ५० स्क्रीन्समध्ये प्रदर्शित झाला. विकास बहल दिग्दर्शित चित्रपट गणितज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटात शैक्षणिक दर्जा किती गरजेचा आहे हे दाखविले आहे.दुरईपांडियन अनबरासी म्हणाले की, कंपनी बऱ्याच दिवसांपासून जपानमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करीत होती. परंतु, कोरोनामुळे याला विलंब झाला. आता चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे, असे अनबरासी यांनी सांगितले. अनबरासी यांच्या म्हणण्यानुसार, हा चित्रपट प्रामुख्याने विद्यार्थ्यांमध्ये चांगलाच लोकप्रिय झाला आहे.कुमारला २५ सप्टेंबर रोजी टोकियो, जपानमधील शिंजुकू पिकाडिली सिनेमात सुपर ३०च्या विशेष स्क्रिनिंगला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. ‘सुपर ३० ला मिळालेला प्रतिसाद पाहून खूप आनंद झाला. लोकांना कथा आवडली आहे. आम्ही ज्या प्रकारे वास्तविक जीवनात काम करतो आणि विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत करतो, त्यामध्ये बरेच काही आहे’ असे कुमार म्हणाले.सुपर ३० जुलै २०१९ मध्ये भारतात प्रदर्शित झाला होता. हृतिक रोशन व्यतिरिक्त या चित्रपटात अमित साध, मृणाल ठाकूर आणि नंदिश संधू देखील आहेत. यापूर्वी बजरंगी भाईजान, पद्मावत, अंधाधुन, कैथी आणि मास्टर सारखी भारतीय चित्रपट जपानमध्ये प्रदर्शित झाली आहेत.0super30_pic.jpg