Cheetah Project : नामिबियातून आलेल्या 'आशा'नं दिली गुडन्यूज; भारतात चित्त्यांची संख्या वाढणार

in #digras2 years ago

भोपाळ : तब्बल 70 वर्षानंतर भारतात पुन्हा चित्ते (Cheetah) आले आहेत. हे चित्ते नामिबियातून (Namibia) आणण्यात आले असून ते बघण्यासाठी लोकं खूप उत्सुक आहेत. या चित्त्यांची एक झलक बघायला मिळावी, अशी त्यांची इच्छा आहे. देशात चित्त्यांची संख्या पुन्हा वाढावी यासाठी प्रयत्न सुरू असून याला यश मिळताना दिसू लागलंय.नामिबियातून आलेल्या चित्त्यांमध्ये 3 मादी आणि 5 नर चित्ते आहेत. यातली 'आशा' नावाचा मादी चित्ता गर्भवती आहे. यामुळं भारतातील चित्त्यांची संख्या वाढेल, अशी आशा पल्लवित झालीय. मध्य प्रदेशमधील कुनो नॅशनल पार्कमधील आशा मादी चित्ता गर्भवती असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, अद्याप याबाबत कोणीही अधिकृत दुजोरा दिला नसला तरी कुनो नॅशनल पार्कमध्ये (Kuno National Park) वन अधिकारी या मादी चित्त्याची मॉनिटरिंग करत आहे.

Cheetah Project : नामिबियातून आलेल्या 'आशा'नं दिली गुडन्यूज; भारतात चित्त्यांची संख्या वाढणार
Published on : 1 October 2022, 10:31 am

By
सकाळ डिजिटल टीम

भोपाळ : तब्बल 70 वर्षानंतर भारतात पुन्हा चित्ते (Cheetah) आले आहेत. हे चित्ते नामिबियातून (Namibia) आणण्यात आले असून ते बघण्यासाठी लोकं खूप उत्सुक आहेत. या चित्त्यांची एक झलक बघायला मिळावी, अशी त्यांची इच्छा आहे. देशात चित्त्यांची संख्या पुन्हा वाढावी यासाठी प्रयत्न सुरू असून याला यश मिळताना दिसू लागलंय.

नामिबियातून आलेल्या चित्त्यांमध्ये 3 मादी आणि 5 नर चित्ते आहेत. यातली 'आशा' नावाचा मादी चित्ता गर्भवती आहे. यामुळं भारतातील चित्त्यांची संख्या वाढेल, अशी आशा पल्लवित झालीय. मध्य प्रदेशमधील कुनो नॅशनल पार्कमधील आशा मादी चित्ता गर्भवती असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, अद्याप याबाबत कोणीही अधिकृत दुजोरा दिला नसला तरी कुनो नॅशनल पार्कमध्ये (Kuno National Park) वन अधिकारी या मादी चित्त्याची मॉनिटरिंग करत आहे.

हेही वाचा: Congress : खर्गेंनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद सोडलं; सोनिया गांधींकडं राजीनामा केला सुपूर्द

'..तर भारतासाठी खास गिफ्ट ठरू शकेल'आशा जंगलातून आली आहे, त्यामुळं ती गर्भवती असण्याची शक्यता आहे. जर असं असेल तर चित्ता प्रोजेक्टसाठी ही एक महत्त्वपूर्ण घटना आहे. आशा चित्ताचा तणाव कमी करण्यासाठी रिकामी जागा व शांततेची गरज आहे. जेणेकरुन ती तिच्या बछड्याच्या पालन-पोषणावर लक्ष देऊ शकेल. आशानं जर बछड्याला जन्म दिला तर नामिबियातून आलेल्या आठ चित्त्यांनंतर हे भारतासाठी खास गिफ्ट ठरू शकेल, असं चित्ता संवर्धन फंडचे कार्यकारी अधिकारी लॉरी मार्कर (Laurie Marker) यांनी म्हटलंय.खात्री पटण्यासाठी ऑक्टोबरपर्यंत वाट पाहावी लागणारसध्या मादी चित्ताच्या व्यवहारात बदल दिसत असून शारिरीक आणि हार्मोनल बदल ‘आशा’ गर्भवती असल्याचं संकेत देत आहेत. ही बातमी उत्साहीत करणारी असली तरी आशा चित्ता गर्भवती असल्याची खात्री पटण्यासाठी ऑक्टोबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. 17 सप्टेंबरला हे चित्ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात 8 चित्ते आणण्यात आले होते. त्यानंतर या चित्त्यांच्या प्रकृतीवर आणि हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत होतं.ahaa.jpg