IND vs AUS 1st Test: रोहित नव्हे

in #mumbai2 years ago

image.png
IND vs AUS 1st Test: रोहित नव्हे, तर पहिल्या कसोटीत हे ३ भारतीय खेळाडू ठरतील 'ट्रम्प कार्ड'; ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी वाढवणार India vs Australia,1st Test : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातली पहिली कसोटी ९ फेब्रुवारीपासून नागपूर येथे सुरू होत आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्पर्धेत दोन्ही संघ एकमेकांना टक्कर देण्यासाठी कंबर कसली आहे. ICC कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलिया आणि भारत अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ही मालिका टीम इंडियासाठी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनल (WTC Final 2023) च्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे. त्यामुळे भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मालिकेत दमदार कामगिरी करण्यासाठी तयार आहे आणि टीम इंडियाचे हे तीन खेळाडू कांगारूंविरुद्ध पहिल्या कसोटीत ट्रम्प कार्ड सिद्ध होऊ शकतात.