CM Yogi Adityanath On SRK Pathaan
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. तब्बल ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतलेल्या शाहरुखला पाहण्यासाठी चाहते तुफान गर्दी करत आहेत. यंदाच्या वर्षी प्रदर्शित झालेला हा बिग बजेट व तगडी स्टारकास्ट असलेला चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरला आहे. चित्रपटांप्रमाणेच यातील गाणीदेखील सुपरहिट ठरली आहेत. ‘झुमे जो पठाण’ हे गाणे चांगलेच गाजत आहे. यावर अनेकांनी रिल्स बनवली आहेत. आता प्रेक्षकांची लाडकी मायरादेखील यावर थिरकली