आधी जुन्या दुचाकीवरुन प्रवास, आता आली अलीशान BMW; पृथ्वी शॉने दिल्या वडिलांना खास शुभेच्छा

in #mumbai2 years ago

क्रिकेट या खेळाने अनेकांचे आयुष्य बदलून टाकले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीला तोंड देत क्रिकेटर म्हणून नावारुपाला आलेले अनेक क्रिकेटपटू आहेत.

2/12
पृथ्वी शॉदेखील त्यापैकीच एक आहे. त्याने क्रिकेटर म्हणून नावारुपाला येण्यापूर्वी खूप मेहनत घेतलेली आहे.

3/12
लहानपणीच आईचे निधन झाल्यामुळे वडील पंकज शॉ यांनीच पृथ्वी शॉला सांभाळले.

4/12
क्रिकेटची आवड असल्यामुळे पृथ्वी शॉ विरार ते चर्चगेट असा प्रवास करुन क्रिकेट अकॅडमीमध्ये सराव करायचा.

5/12
सध्या पृथ्वी शॉने त्याच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत.

6/12
यातील एका फोटोमध्ये पृथ्वी शॉचे वडील दुचाकी चालवताना दिसत आहेत. तर वडिलांच्या मागे पृथ्वी शॉ बसलेला दिसतोय. पृथ्वीचे वडील त्याला क्रिकेटच्या सरावासाठी घेऊन जात असल्याचे या फोटोमध्ये दिसत आहे.