Share Market : शेअर बाजारात घसरणीला मोठा ब्रेक; सेन्सेक्स 1000 अंकांनी वधारला

in #yavatmal2 years ago

2share_20market_20down_8.jpg
ताज्या
शहर

गेम्स
मनोरंजन
देश
क्रीडा

ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो
आणखी

Share Market : शेअर बाजारात घसरणीला मोठा ब्रेक; सेन्सेक्स 1000 अंकांनी वधारला
Published on : 14 October 2022, 4:15 am

By
टीम ईसकाळ टीम

तीन दिवसांच्या मोठ्या पडझडीनंतर आज गुंतवणूकरांची चांदी झाली आहे. गुरुवारी शेअर बाजारात मोठी पडझड झाल्यानंतर आज शेअर बाजाराची सुरुवात दणक्यात झाली आहे. आज गुंतवणूकदारांकडून खरेदी जोर दिसून येत आहे. शेयर बाजार सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी तेजी दिसून आली आहे. सकाळच्या पहिल्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी चांगल्या अंकांनी वधारले आहेत. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स 973 अंकांनी वधारत 58,208 अंकावर तर, निफ्टी 278 अंकांनी वधारत 17,292 अंकांवर व्यवहार करत होता.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?कमकुवत जागतिक संकेतांमुळे भारतीय बाजार ढासळल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. बँकिंग शेअर्सना सर्वाधिक फटका बसला. वाढत्या व्याजदरामुळे कर्जाची मागणी कमी होऊ शकते, असे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे. ज्याचा परिणाम बँकिंग शेअर्सवर झाला. निफ्टीला सलग तीन दिवस 200-दिवसीय SMA म्हणजेच 16950 जवळ सपोर्ट मिळत आहे. तर 17150 च्या जवळ त्याला रझिस्टंसचा सामना करावा लागत आहे. जर निफ्टी 16950 च्या खाली घसरला तर बाजार आणखी खाली येऊ शकतो आणि ही घसरण 16800-16700 पर्यंत जाऊ शकते.गुरुवारी बाजारात खूप अस्थिरता होती असे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. निफ्टीला 200 DMA वर सलग तीन दिवस सपोर्ट मिळत आहे. याशिवाय डेली आरएसआयही तेजीचा क्रॉसओव्हर देत आहे.आता शॉर्ट टर्ममध्ये निफ्टी छोट्या श्रेणीत बांधला गेला आहे. निफ्टीला खाली 16950 च्या दिशेने सपोर्ट आहे. वरच्या बाजूला, 17300 पातळीवर रझिस्टंस आहे.